News

या तप्त सूर्याला मी डोळे भरून पाहिले आहे – धनंजय मुंडेंच्या पवारांना हृदयस्पर्शी शुभेच्छा!

मुंबई दि. १२…. आज येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त बळीराजा कृतज्ञता दिन हा अनोखा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राबवण्यात आला. पवारांच्या तालमीतले लढवय्ये शिष्य म्हणून नावलौकिक असलेले राष्ट्रवादीचे नेते व विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी शरद पवार यांना मानाचा फेटा बांधला.
 अभिष्टचिंतानाच्या कार्यक्रमात गुरूना शिष्याने फेटा बांधला हा चर्चेचा विषय ठरला!
 आ. धनंजय मुंडे यांच्यातील नेतृत्व गुणांना खरी झळाळी शरद पवार यांनी दिली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मुंडेंनीही मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत आपल्या व्यक्तिमत्व, कसलेले वक्तृत्व, अभ्यासपूर्ण व आक्रमक शैलीने राज्यात आपल्या नेतृत्वाचा दबदबा निर्माण केला. खा. पवार यांची सातारा येथील पावसात भिजलेली व राज्यात गाजलेली “ती” सभा व योगायोगाने परळीत त्याचवेळी धनंजय मुंडे यांची पावसात भिजत गाजलेली सभा त्यावेळी प्रचंड लोकप्रिय व निर्णायक ठरली होती; यावेळीही गुरू – शिष्याच्या नात्याची राज्यात  चर्चा गाजली होती.
आज शरद पवार यांनी ८०व्या वर्षात पदार्पण केले, अनेक गंभीर आजारांवर मात करत त्यांनी केलेली  किमया वाखान्याण्याजोगी आहेच. श्री. मुंडे यांनीही कृतज्ञता दिनाच्या कार्यक्रमानंतर आपल्या गुरूंना फेटा बांधतानाचा फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करत “या तप्त सूर्याला मी डोळे भरून पाहिले आहे, व त्याप्रमाणेच झिजण्यासाठी मी स्वतःला वाहिले आहे…” अशी हृदयस्पर्शी पोस्ट करत आपल्या गुरुप्रति असलेला नितांत आदर व प्रेम व्यक्त केलं आहे.
राजकीय जीवनात फेटा बांधण्याचे कसब लहानपणापासूनच माहित आहे सार्वजनिक राजकीय जीवनातील अनेक कार्यक्रमात अनेकांना फेटा बांधण्याचा ही योग आला मात्र आज
महाराष्ट्राच्या जाणता राजाला फेटा बांधण्याचा बहुमान या सामान्य मावळ्याला मिळाला,  धन्य झालो आज! अशी प्रतिक्रियाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *