News

भगवान गडावर भक्ती – शक्तीचा संगम; ना. मुंडे भगवानगडावर नतमस्तक! महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेची सेवा करण्याची शक्ती द्या – ना. मुंडेंचे भगवान बाबांना साकडे

धनंजय मुंडेंचे भगवानगडावर भव्य स्वागत!
अहमदनगर / बीड दि. ०९ (प्रतिनिधी) : मराठवाड्यासह सबंध महाराष्ट्राचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवानगडावर भक्ती – शक्तीचा अनोखा संगम आज घडला; महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील सर्व आमदारांसह भगवानगड येथे जाऊन संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची शक्ती द्या असे साकडे ना. मुंडे यांनी भगवान बाबांकडे घातले.
भक्ती व शक्तीचा संगम समजल्या जाणाऱ्या भगवानगडाला मराठवाड्याचा राजकीय ऊर्जास्रोत मानले जाते. परंतु काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना येथे येण्यापासून अडवणूक करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु याच गडावर आज ना. मुंडेंना सन्मानाने निमंत्रित करण्यात आल्याने हा क्षण आपल्यासाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे, अशा शब्दात ना. मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भगवान गडाच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत!
दरम्यान ना. धनंजय मुंडे हे नारायण गड येथे दर्शन करून भगवानगड येथे हेलिकॉप्टरने आले असता, गडाच्या प्रवेशद्वारावर भगवानगड परिसरातील नागरिकांनी १११ किलो फुलांचा हार क्रेनद्वारे घालून ना. मुंडे यांचे भव्य स्वागत केले. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. बाळासाहेब आजबे, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित, प्रतापराव ढाकणे आदी उपस्थित होते.
दगडांची फुले झाली ही भगवानबाबांची किमया – ना. मुंडे
याच भगवानगडावर काही वर्षांपूर्वी दगड फेकले गेले मात्र आज गडाच्या महंतांनी स्वतः निमंत्रित करून बाबांचे आशीर्वाद घ्यायला मला गडावर बोलावले हे माझे भाग्य असून, ही किमया भगवनबाबांच्या मुळे घडू शकली. मी येथे राज्याचा मंत्री नाही तर बाबांचा भक्त म्हणून गडावर आलो आहे; या गडाला कधीही काहीही मागायची गरज पडू देणार नाही व भगवानगड हा कायम राजकारणमुक्तच राहील असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांचे गुरुपरंपरेत स्थान, गड सर्व भक्तांसाठी खुला; गडावर राजकारण होणार नाहीच – महंत नामदेव शास्त्री
ना. धनंजय मुंडे यांचे भगवानगड येथील गुरू परंपरेत स्थान आहे. धनंजय हे गडाचे निस्सीम भक्त असून हा गड सर्व भक्तांना दर्शनासाठी कायम खुला आहे. मात्र पूर्वी सांगितल्याप्रमाणे या गडावर कधीही राजकारण होणार नाही असे गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितले. ना. मुंडे यांना गडाच्या वतीने संत भगवानबाबा व विठ्ठलाची प्रतिमा देऊन यावेळी नामदेव शास्त्री यांनी आशीर्वाद दिले. यावेळी ‘भगवान बाबा की जय’च्या घोषणा देत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
————————–
नारायणगडावर विकास आराखडा पेक्षाही वेगळी आणि चांगली कामे करून दाखवू –  ना.  धनंजय मुंडे
बीड दि. 9 ——- बीड जिल्ह्यातील शक्तीपीठ असलेल्या नारायण गडाच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला विकास आराखडा तर पूर्ण करायचाच आहे, मात्र त्यापेक्षाही वेगळी आणि काहीतरी चांगली कामे करून दाखवण्याचा शब्द  जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.
 महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र नारायण गड येथे जाऊन दर्शनाने केली. महंत शिवाजी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांच्या समवेत माजलगाव चे आमदार प्रकाश दादा सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे , आमदार संदीप भैया शिरसागर,  माजी आमदार अमरसिंह पंडित जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
गडावर आल्यानंतर राजकीय भाषण करायचे नाही हे संस्कार आपल्यावर झालेले आहेत . त्यामुळे आज या ठिकाणी कोणतेही राजकीय भाष्य करण्यासाठी मी आलेलो नाही तर नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर शक्ती आणि ऊर्जा मिळावी यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे .
या गडाच्या विकासासाठी विकास आराखडा मंजूर झाल्याचे मला समजले , मात्र त्यातील कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत ही कामे ज्यांना पूर्ण करता आली नाहीत, त्यांना त्याचे फळ भोगावे लागले आहे . मात्र मी हा विकास आराखडा पूर्ण करीलच त्याशिवाय आणखी काही वेगळी आणि चांगली कामे करता येतील का यासाठीही माझा विशेष प्रयत्न असेल,  बोलण्यापेक्षा कृतीतून मी ते सिद्ध करून दाखवेल,  गडावर खोटे बोलणार्‍यांचे यांचे काय होते हे आपण सर्वांनी पाहिले आहे असे मुंडे म्हणाले.
 प्रास्ताविकात बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांचे आपल्या मतदारसंघात स्वागत करतानाच जिल्ह्याला त्यांच्या कडून मोठ्या अपेक्षा असून आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते जिल्ह्याला विकासावर जिल्ह्याला विकासात अग्रभागी ठेवतील असा विश्वास व्यक्त करतानाच संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची ग्वाही दिली.
 संस्थानच्या वतीने यावेळी श्री. मुंडे यांच्यासह सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच गडावर आल्याने भक्तांनी ही मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यावेळी बीडचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर,  फारुख पटेल , कल्याण आखाडे,  सुभाष राऊत , अमर नाईकवाडे , चंद्रकांत नवले, बबनराव गवते यांच्यासह पदाधिकारी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *