सौ. राजश्रीताई मुंडे यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा समारंभ संपन्न
परळी दि. २९….. : मकर संक्रांतीनंतर महिलांच्या स्नेहाचा, हळदी कुंकू व तीळ गुळासह स्नेहाच्या देवाण घेवाणीचा हळदी कुंकू समारंभाचा उत्तरार्ध आज परळी येथील राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या पंढरी या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी मुंडे कुटुंबियांच्या वतीने सर्व महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ व वाण देऊन स्वागत केले.
परळी तालुक्यातील व शहरातील असे दोन दिवस चाललेल्या या समारंभात पंडित कल्याणजी गायकवाड प्रस्तुत सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. काल दि. २८ रोजी हळदी कुंकू समारंभाचा पहिला दिवस परळी तालुक्यातील असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. तर या समारंभाचा उत्तरार्ध आज शहरातील महिलांना हळदी कुंकू लावून संपन्न झाला.
परळीतील महिला वर्गाने आमच्या कुटुंबावर भरभरुन प्रेम केले आहे, हा समारंभ म्हणजे आमच्यातील स्नेह वृद्धिंगत होण्याचे एक माध्यम आहे अशा शब्दात सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई शिरसाट, ना. धनंजय मुंडे यांच्या भगिनी सौ. उर्मिलाताई केंद्रे, सौ. शकुंतला ताई केंद्रे, सौ. प्रेमिलाताई केंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर मुंडे कुटुंबियांच्या वतीने सौ. राजश्रीताई यांच्यासह सौ. मनीषा अजय मुंडे, सौ. सरिता विजय मुंडे, सौ. अमृता रामेश्वर मुंडे व सौ. सोनाली अभय मुंडे यांनी महिलांचे स्वागत करत हळदी कुंकू, वाण व तिळगुळ देऊन स्वागत केले.