News

धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीतील डॉक्टरांना फेस शिल्डचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या संकट काळात कोरोना विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणाऱ्या डॉक्टर समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेयर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने परळी तालुक्यातील डॉक्टरना मोफत फेस शिल्डचे  वाटप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. धनंजय मुंडे म्हणाले की, कोरोनाच्या संकटातही आपले कार्य जोमाने करत आहात रूग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. यापुढे अशीच सेवा द्यावी तसेच तुमच्या कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
           देशात व राज्यात कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा भयानक परिस्थिती आपल्या जीवाची पर्वा न करता परळीतील सर्व डॉक्टर रूग्णां सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार.ना. अजित पवार  खा. सुप्रिया सुळे, ,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल्सच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या हस्ते  फेसशिल्डचे वितरण करण्यात आले.  फेसशिल्ड मुळे डॉक्टर यांना या रोगाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळणार आहे असलेल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ना. अजित पवार  खा. सुप्रिया सुळे, ,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांनी फेस शिल्ड मास्क उपलब्ध करून दिले.  या आगोदर ही डॉक्टरांना पी.पी.किटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे परळीतील डॉक्टर समाधान व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनसामान्यासोबतच डाॅक्टरांच्याही सुरक्षिततेची काळजी घेणे महत्वाचे आहे त्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे हे सदैव प्रयत्नशिल असल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले.   यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे ,परळी डाॅक्टर असोसिएशन अध्यक्ष  डाॅ.ल.डी.लोहिया.IMA  चे डाॅ.अजीत केंद्रे ,डाॅ.मधुसदन काळे,डाॅ.सूर्यकांत मुंडे,डॅा.दिपक पाठक ,डाॅ.गुरुप्रसाद देशपांडे ,डाॅ.राजेश जाजु ,डाॅ.विजय रांदड ,डाॅ.मुंकुद सोंळके ,डाॅ.दिनेश लोंढा राष्ट्रवादी डाॅक्टर तालुका अध्यक्ष डाॅ.आनंद टिंबे.डाॅ.मोसिन मानीयार  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *