News

खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस परळीत सिनेअभिनेते गोविंदा, ना. धनंजय मुंडे केक कापून करणार साजरा

परळी (दि. 10) — : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचा 80 वा वाढदिवस परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील मोंढा मैदान येथे प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंदा तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत 81 किलो चा केक कापून साजरा करण्यात येणार आहे.
मा.खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात 12 डिसेंबर रोजी मोंढा मैदान येथे अभूतपूर्व विद्युत रोशनाई करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गरजू कुटुंबातील 5000 महिलांना साडी वाटप, छञपती शिवाजी महाराज चौक व राणी लक्ष्मीबाई टाँवर येथे पेढे वाटप, संजय गांधी निराधार लाभार्थी यांना प्रमाणपञाचे वाटप, यांसह खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रमुख कार्यक्रमाचे लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमास परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खा. पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी कोविडविषयक नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *