News

फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

पुणे (दि. ०३) —- : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण व सक्षमीकरणासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांच्या या महान कार्याची कृतज्ञता म्हणून राज्य सरकारने या वर्षी पासून त्यांची जयंती राज्यात महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करून या ऐतिहासिक वाड्याला जतन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ना. मुंडे यांनी पुण्यातील फुले वाडा येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके, सह आयुक्त भारत केंद्रे, यांसह समाज कल्याण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ना. मुंडे यांनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण वाड्याची पाहणी केली, यावेळी राज्य सरकारच्या वतीने फुले वाड्यात ज्या – ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या पुरवून या ऐतिहासिक स्थळाचा पुनर्विकास केला जाईल असेही म्हटले आहे.

One thought on “फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

  1. चांगला उपक्रम आहे.पुढील भविष्यासाठी शुभेच्छा.

Leave a Reply to वसंत खेडकर Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *