‘त्या’ जोडप्यांचा आगळावेगळा विवाहसोहळा संपन्न!
यावेळी कोणत्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता नवरा-नवरींनी एकमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले आणि विवाह संपन्न झाला.
बीड : एचआयव्हीबाधित परिवारातील अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा बीडमध्ये संपन्न झालाय. विशेष म्हणजे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राम येथे संपन्न झाल्यानं जिल्ह्यात या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. यावेळी कोणत्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता नवरा-नवरींनी एकमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले आणि विवाह संपन्न झाला.