News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त धनंजय मुंडेंनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

परळी वै. दि.06……… महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ.धनंजय मुंडे यांनी परळी रेल्वे स्टेशन येथील महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.

यावेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जाबेरखा पठाण, प्रा.डॉ.विनोद जगतकर, माधवराव ताटे, सुर्यभान मुंडे, महादेव रोडे, दत्ताभाऊ सावंत, किशोर पारधे, अनंत इंगळे, शेख सिराज भाई, रवि मुळे, सय्यद सिराज, प्रा.शाम दासूद, नितिन रोडे, फुलचंद गायकवाड, सुरेश नानवटे, शंकर कापसे, तक्कीखान, रजाखान, उत्तम भाग्यवंत, प्रताप समिंदरसवळे, राज जगतकर, अमर रोडे आदी उपस्थित होते.

—————-

भाटीया कुटुंबियांचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन

परळी वै., दि.06…….. परळी शहरातील व्यापारी बलजिंदर भाटीया यांचे ह्रदयविकाराने दुःखद निधन झाले. यांच्या दुःखद निधनाबद्दल आ.धनंजय मुंडे यांनी गुरूवारी भाटीया कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत बाजीराव धर्माधिकारी, सुर्यभान मुंडे, सुंदर गित्ते, नरेश हालगे, बापु नागरगोजे आदी उपस्थित होते.

बलजिंदर भाटीया हे धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र होते. बलजिंदर भाटीया यांच्या निधनाने आपण एक जिवलग मित्र गमावला असून, ही पोकळी कायम राहील, अशा भावना त्यानी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *