News

नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध कामांची केली पाहणी

परळी (दि. १९) —- : रविवारी दिवसभर चिखल तुडवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी दौरा केलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आज परळीतल्या रस्त्यांवर पायी फिरताना दिसले. आज (दि. १९) रोजी परळी शहरातील विविध वॉर्डांमध्ये त्यांनी रस्ते, नाल्या आदी कामांची पायी दौरा करत पाहणी केली.
यावेळी धनंजय मुंडे यांनी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना, विविध रस्त्यांची कामे यांचा आढावा घेतला, तसेच प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा व कामांबाबतची मते जाणून घेतली. यावेळी काही पूर्ण झालेल्या रस्त्यांचे उदघाटन तसेच काहि ठिकानी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कामांचे भूमीपूजनही ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाल्यांची कामे जलदगतीने व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत तसेच त्यासाठी उखडलेले रस्ते पुन्हा नव्याने तयार करून घ्यावेत या बाबत संबंधित कंत्राटदार, नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी आदींना कामाच्या स्थळी बोलावून सूचना दिल्या. यावेळी कामांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड झालेली सहन करणार नाही, असा सज्जड इशाराच ना. मुंडेंनी दिला.
परळी नगर परिषदेच्या मार्फत शहरात सुरू असलेल्या अत्यंत महत्वकांक्षी योजनेतील नाल्याच्या कामांमुळे नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागत आहे, परंतु लॉकडाऊनचे परिणाम तसेच कामाचा दर्जा सांभाळणे यासाठी नागरिकांनी थोडा त्रास सहन करावा, उखडलेले रस्ते पुन्हा नव्याने व आणखी चांगले करून देऊ, असे वक्तव्य ना. मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना केले होते.
त्यानुसार आज सकाळपासून ना. धनंजय मुंडे हे नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आदींना घेऊन परळीतल्या रस्त्यांवर फिरताना दिसले. यावेळी त्यांच्यासमवेत सोबत न. प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, चंदूलाल बियाणी, रा. कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, शंकर आडेपवार, भाऊड्या कराड, प्रा. विनोद जगतकर, चेतन सौंदळे, अय्युबखान पठाण, विजय भोयटे, राजेंद्र सोनी, नितीन मामा कुलकर्णी, वैजनाथ सोळंके, दीपक तांदळे, प्रणव परळीकर, अनंत इंगळे, यांसह त्या त्या वॉर्डातील नगरसेवक, पदाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *